आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 70 टक्क्यांवर; गुरुवारी 11,813 नव्या रुग्णांची भर, 413 बाधितांचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णांची एकूण संख्या 5,60,126 झाली असून त्यापैकी 3,90,958 रुग्ण बरे होऊन घरी गेले

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ७० टक्क्यांवर गेले आहे. गुरुवारी ९,११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मात्र त्यासोबतच ११,८१३ नव्या रुग्णांची भरही पडली आणि ४१३ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५,६०,१२६ झाली असून त्यापैकी ३,९०,९५८ रुग्ण बरे होऊन (६९.८ टक्के ) घरी गेले आहेत. सध्या राज्यभरात १,४९,७९८ रुग्ण आता उपचार घेत आहेत. मृतांची एकूण संख्या १९,०३६ झाली आहे. दरम्यान,मराठवाड्यात एकूण १,१०३ रुग्णांची भर पडली आहे.

मराठवाड्यात दिवसभरात १,१०३ रुग्ण, ३५ मृत्यू

मराठवाड्यात गुरुवारी कोरोनामुळे ३५ मृत्यूंची नोंद झाली. यात सर्वाधिक २० बळी एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात नोंदवले गेले. औरंगाबादेत ६, नांदेड ५ लातूर २ आणि जालना व हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रुग्णसंख्येतही मोठी भर पडली असून यात औरंगाबाद ३३५, उस्मानाबाद १५५, नांदेड ८२, जालना १२२, हिंगोली ६१, लातूर २०८, परभणी २५ तर बीड जिल्ह्यात ११५ नवीन कोरोना रुग्ण आढळले.

बातम्या आणखी आहेत...