आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आतापर्यंत 13.16 लाख रुग्ण कोरोनामुक्त तर 40 हजार 859 रुग्णांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 15.54 लाख पार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा रिकव्हरी रेट 84.71 टक्के तर मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे

राज्यात बुधवारी 10 हजार 552 नवीन रुग्णांची नोंद झाली, 19 हजार 517 लोक कोरोनामुक्त झाले आणि 158 जणांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 15 लाख 54 हजार 389 झाली आहे. यातील 1 लाख 96 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 13 लाख 16 हजार 769 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात कोरोनामुळे एकूण 40 हजार 859 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.71 टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे.