आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात गुरुवारी 10 हजार 226 रुग्णांची नोंद, 337 जणांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 15.64 लाख पार

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.4 टक्के तर मृत्यूदर 2.60 टक्के एवढा आहे

राज्यात गुरुवारी 10 हजार 226 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 337 जणांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 15 लाख 64 हजार 615 आणि एकूण मृत्युसंख्या 41 हजार 196 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी 13 हजार 714 लोक कोरोनामुक्त झाले. यासोबत एकूण बरे झालेल्यांची संख्या 13 लाख 30 हजार 483 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 92 हजार 459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.4 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्युदर 2.60 टक्के एवढा आहे

दरम्यान, राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोनामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी व्हिडिओ कॉंन्फरन्सद्वारे चर्चा केली. राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.

बातम्या आणखी आहेत...