आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:एकूण रुग्णसंख्या 6 लाखांच्या पुढे; सोमवारी 8,493 रुग्णांची नोंद तर 228 रुग्णांचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात आतापर्यंत 20,265 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या सहा लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या राज्यात 6,04,358 कोरोना रुग्ण असून, यातील 4,28,514 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबतच सध्या राज्यात 1,55,268 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सोमवारी राज्यात 8,493 रुग्णांनी नोंद झाली, तर 228 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानातील 12 जणांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक'वर कोरोनाचा शिरकाव झाला. सिल्व्हर ओक वरील 12 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यापैकी कोणीही पवारांच्या संपर्कात नसल्याने चिंता मिटली आहे.

सिल्व्हर ओकवरील एकूण 12 जणांची रॅपिड अँटिजन कोरोना टेस्ट करण्यात आली होती. या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यापैकी कोणीही पवारांच्या संपर्कात नसल्याने चिंता मिटली आहे. शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही न भेटण्याची शक्यता आहे.

पवारांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

दरम्यान सिल्व्हर ओकमधील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवार यांचे पीए यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात शरद पवार यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप नेता निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. निलेश यांनी सोमवारी ट्विट करून ही माहिती दिली. निलेश राणे यांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करून घेतले आहे.

निलेश राणे यांनी ट्विट केले की, ''कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करून घेतले आहे.'' तसेच गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याआधी राज्यातील 7 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...