आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:एकूण रुग्णसंख्या 6.15 लाखांवर; मंगळवारी 11,119 रुग्णांची नोंद तर 422 रुग्णांचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची संख्या 6,15,477 झाली आहे. मंगळवारी राज्यात 11,119 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 422 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,56,608 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत, तर 4,37,870 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वाईट बाब म्हणजे, आतापर्यंत 20,687 रुग्णांचा संक्रमणामुळे मृत्यूही झाला आहे.

एकूण रुग्णसंख्या 6.15 लाखांवर; मंगळवारी 11,119 रुग्णांची नोंद तर 422 रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी

या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

मोफत उपचार करा, अन्यथा 5 पट दंड आकारला जाईल- राजेश टोपे

श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी रुग्णालयांना मोफत उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. यादरम्यान आरोग्यमंत्री बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा केली.

कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण-हसन मुश्रीफ

कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना 25 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...