आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या पुढे; शनिवारी आढळले 8,348 रुग्ण तर 144 जणांचा मृत्यू

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील दादर परिसरात नागरिकांची तपासणी करताना आरोग्य कर्मचारी

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाचली आहे. शनिवारी(दि.18) राज्यात 8,348 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 3,00,937 झाला असून, आतापर्यंत 11,596 रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 23 हजार 317 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत तर, 1 लाख 65 हजार 663 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापूर्वी  शुक्रवारी राज्यात 8,308 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 258 रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात 11 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी 144 रुग्णांच्या मृत्यूसह राज्यातील एकूण मृतांचा आकडा 11,596 झाला आहे. विभागाने म्हटले की, शनिवारी 5,306 रुग्णांना ठीक झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाजपचे आंदोलन

राज्यात दुध उत्पादकांना प्रती लीटर 10 रुपयांचे अनुदान देण्याच्या मागणीसाठी भाजपकडून 1 ऑगस्टला आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप किसान मोर्चााचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी याबाबत घोषणा केली. या आंदोलनात भाजपसोबत रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामदेखील सामील होणार आहे. याबाबत बोंडे म्हणाले की, आंदोलनात तहसीलदारांमार्फत शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची तब्येत ठीक राहण्यासाठी त्यांना दुध पाठवतील. तसेच, आंदोलनावेळी 'मुख्यमंत्री दुध घ्या, दुधाला भाव द्या' अशा घोषणाही दिल्या जातील.