आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्याचा रिकव्हरी दर वाढला, शनिवारी 14 हजार 238 रुग्णांना डिस्चार्ज ; राज्यात आतापर्यंत एकूण 13 लाख 58 हजार 606 रुग्ण बरे होऊन घरी गेले

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 2.63 एवढे झाले आहे.

राज्यात शनिवारी 79.4 हजार लोकांची चाचणी झाली. यातील 10 हजार 259 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. मागील 24 तासांत 14 हजार 238 लोक बरे झाले आणि 250 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 15 लाख 86 हजार 321 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातील 1 लाख 85 हजार 486 रुग्णांवर उपचार सुरू असून 13 लाख 58 हजार 606 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 41 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.63 एवढे झाले आहे. राज्यात 23 लाख 95 हजार 552 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 749 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, 'माझं कुटुंबं, माझी जबाबदारी' या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून 'पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार', या अभियानाला पुणेकरांनी साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आवाहन केलं. अजित पवारांच्या हस्ते पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...