आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, रविवारी 11 हजार 204 रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या 15 लाख 95 हजार 381

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.86 टक्के तर मृत्यू दर 2.64 टक्के

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्ये वाढ होत आहे. रविवारी 11 हजार 204 लोक बरे होऊन घरी परतले. यासोबत एकूण कोरोनमुक्तांचा आकडा 13 लाख 69 हजार 810 झाला आहे. रविवारी 9060 नवीन रुग्ण आढळले, तर 150 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 15 लाख 95 हजार 381 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 42 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1 लाख 82 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.86 टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यू दर 2.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 81 लाख 39 हजार 466 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 95 हजार 381 म्हणजेच 19.6 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान सध्या राज्यात 24 लाख 12 हजार 921 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 23 हजार 384 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...