आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात एकाच दिवसात विक्रमी 22 हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णसंख्या 11 लाख 67,496

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील रिकव्हरी रेट 71.47 टक्क्यांवर, सध्या 3 लाख 887 अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात शुक्रवारी तब्बल २२ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. हा एकाच दिवसात काेरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याचा नवा विक्रम आहे. आता राज्यात तब्बल ८ लाख ३४,४३२ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ७१.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात २१,६५६ नवे रुग्ण, तर ४०५ मृत्यूची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या आता ११ लाख ६७,४९६, तर बळींचा आकडा ३१,७९१ वर गेला आहे. राज्यात सध्या ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मृत्युदर २.७२ टक्क्यांवर आहे.