आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात सोमवारी 8,240 नवीन रुग्णांची नोंद, तर 176 रुग्णांचा मृत्यू; एकूण आकडा 3.18 लाखांवर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात आतापर्यंत 1,69,569 रुग्णांना ठीक झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे

राज्यात सोमवारी 8,240 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 176 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा  3,18,695 झाला आहे. तसेच, आतापर्यंत राज्यात 12,030 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,31,334 रुग्णांवर उपचार सुरू असून,  1,75,029 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापूर्वी रविवारी 9 हजार 518 कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर 258 बाधितांचे मृत्यू नोंदले गेले. 

मुंबईत एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण 

मुंबईत मागील 24 तासात 1,046 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर, 64 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मुंबई महापालिकेने सांगितल्यानुसार, मुंबईमध्ये आतापर्यंत 1,01,224 संक्रमित आहेत, तर 5,711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23,828 झाली आहे. 

धारावीमध्ये आता फक्त 143 अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईतील 6.5 लाख लोकसंख्या असलेल्या धारावीमध्ये 24 तासात 36 नवीन रुग्ण समोर आले आहेत. धारावीमध्ये एकूण रुग्ण 2480 आहेत, पण सध्या फक्त 143 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.

रेल्वे स्टेशनवर मशीनमधून मिळतील मास्क, सॅनिटाइजर आणि ग्लब्ज

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आपल्या रेल्वे स्टेशनवर अशा मशीन लावणार आहे, ज्यातून प्रवाशांना कधीही मास्क आणि सॅनिटायजर मिळू शकतील. सध्या हे हेल्थ एटीएम मुंबई सीएसटीएम, एलटीटी कुर्ला आणि दादर स्टेशनवर लावले जातील. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, मध्य रेल्वे प्रिवेंटिव कियोस्क म्हणजेच, एक स्वयंचलित वेंडिंग मशीन लाॉन्च करत आहे. यातून ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटायजर आणि हँड ग्लव्स मिळतील. याशिवाय मुंबई मंडळाने प्रवाशांच्या सामानाला सॅनिटाइज करण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहे.

मराठवाड्यात 642 नवे रुग्ण, 8 मृत्यू

मराठवाड्यात रविवारी सायंका‌ळपर्यंत एकूण 642 नव्या कोरोनाग्रस्तांचे निदान झाले, तर 8 बाधितांचा मृत्यू झाला. यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 399 रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्येही औरंगाबादचे 4, बीड 2 आणि नांदेड येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात 131, बीड 14, हिंगोली 23,नांदेड 66, परभणीत ९ नव्या रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये बीड येथील 2, नांदेड 2 बाधितांचा समावेश आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी गेलेले राज्य राखीव दलातील हिंगोलीचे 9 जवान पॉझिटिव्ह आढळले आहेत.

100 रुपयात स्टेशनवर होईल हेल्थ चेकअप

प्रवाशांच्या आरोग्य चाचणीसाठी मुंबई मंडळाने कल्याण, ठाणे आणि लोकमान्य तिळक टर्मिनसमध्ये हेल्थ एवीएम कियोस्क लावले आहेत. मुबंईच्या 12 उपनगर स्टेशन, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, चेंबूर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोली, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि बदलापूर स्टेशन्समध्ये हेल्थ एटीएमच्या स्थापनेसाठी ई-टेंडर मागवले आहेत. यामुळे प्रवाशांना 16 ते 18 प्रकारच्या आरोग्य चाचण्यांची सुविधा मिळेल. यात रक्तदाब, रक्तातील साखर, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि इतर आरोग्य मीट्रिक सामील आहेत. बेसिक स्क्रीनिंगसाठी 50 रुपये आणि हीमोग्लोबिन आणि ब्लड शुगरशिवाय 18 इतर पॅरामीटरसाठी 100 रुपये घेतले जातील.