आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Corona Virus Cases And Deaths 22 July News And Updates | District Wise Today News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad Bhandara Ahmednagar

महाराष्ट्र कोरोना:राज्यात मंगळवारी 8,369 नव्या रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 3 लाख 27,031; तर बळींचा आकडा 12,276

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 55.72% तर कोरोना मृत्युदर 3.75%

राज्यात मंगळवारी ८,३६९ रुग्ण तर २४६ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ लाख २७,०३१ तर बळींचा आकडा १२,२७६ वर गेला आहे. मंगळवारी ७,१८८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ८२,२१७ झाली आहे. राज्यात सध्या १ लाख ३२,२३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ५५.७२% तर कोरोना मृत्युदर ३.७५% इतका आहे.

मराठवाडा : कोरोनाचे १५ बळी, ६३६ नवे रुग्ण

कोरोनाने मंगळवारी मराठवाड्यात १५ बळी घेतले. बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, हिंगोलीत ७, जालना १००, बीड २६, उस्मानाबाद २०, परभणी २६ तर नांदेड जिल्ह्यात ३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. हिंगोलीत शहर व सेनगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला असून मंगळवारी दोन बळीही गेले आहेत. बीड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी कोरोना योद्धा असलेल्या अधिपरिचारिकेसह एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील बळींची संख्या १९ झाली. जिल्हा रुग्णालयातील ही ४० वर्षीय अधिपरिचरिका कोरोना कक्षात सेवा देत होती.

औरंगाबाद : ४२५ रुग्ण, ९ मृत्यू : 

जिल्ह्यात शुक्रवारी ४२५ रुग्ण, तर ९ रुग्णांच्या मृत्यूची नाेंद झाली. आता जिल्ह्यात एकूण काेराेनाग्रस्तांची संख्या ११,६६६ वर पोहचली आहे. जिल्ह्यात एकूण बळींची संख्या ४०७ झाली. आतापर्यंत एकूण ६,४९७ जण काेराेनामुक्त झाले असून ४७६२ जणांवर उपचार सुरू आहेत.