आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरणीला, बुधवारी दिवसभरात उच्चांकी 23,371 रुग्णांची कोरोनावर मात; रिकव्हरी रेट 87.51 टक्के

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात आतापर्यंत 24 हजार 633 रुग्णांनी प्राण गमावले, मृत्यू दर 2.64 टक्के

राज्यात बुधवारी 8142 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 180 जणांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 16 लाख 17 हजार 658 झाली असून राज्यात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 24 हजार 633 झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.64 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 58 हजार 852 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी 23 हजार 371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासोबत राज्यातील एकूण कोरोनमुक्त रुग्णांची संख्या 14 लाख 15 हजार 679 झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 87.51 टक्के एवढा आहे.

बातम्या आणखी आहेत...