आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्येत वाढ, दिवसभरात 13 हजार 247 रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या 16.32 लाख पार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 88.52 टक्के, तर मृत्यू दर 2.63 टक्के

राज्यात कोरोना रुग्णांच्या घसरणीचा वेग कायम आहे. शुक्रवारी देखील नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात शुक्रवारी 7347 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 184 जणांचा मृत्यू झाला. यासोबत राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16 लाख 32 हजार 544 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी 13 हजार 247 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.52 टक्क्यांवर गेले आहे. राज्यात सध्या 1 लाख 43 हजार 922 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 43 हजार 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे.

सलग काही दिवसांपासून संख्या घटत असून त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र धोका संपलेला नाही इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सवही सुरू आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.