आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनादहन:राज्यातील 16 लाख नागरिकांना आतापर्यंत झाली कोरोनाची बाधा, आता विषाणूचा प्रभाव हळूहळू होतोय कमी

नितीन फलटणकर | औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेग मंदावला; मात्र, कोरोना संपलेला नाही, येणाऱ्या काळात अधिक काळजी घ्यावी

विजयादशमीनिमित्त आनंदाची बातमी आहे. कोरोनाने महाराष्ट्रातील जनतेपुढे आता सपशेल हार पत्करली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण मे महिन्यांनंतर प्रथमच १० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केला होता. ९ मार्च रोजी पहिला कोरोना रुग्ण राज्यात आढळून आला. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत गेली. मात्र ऑक्टोबर महिन्यात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण मंदावल्याचे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मार्च आणि एप्रिल महिन्याचा अपवाद वगळता राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांमधील बाधित रुग्णांची टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा अधिक राहिली आहे. मात्र, मे महिन्यापासून सातत्याने १६ टक्क्यांपेक्षा अधिक असलेला पॉझिटिव्हिटी रेट ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात १० टक्क्यांपेक्षा कमी होताना दिसतो आहे. सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात १ लाख ५३ हजार ३३१ बाधित आढळले होते. ऑक्टोबरमध्ये हीच संख्या ९२ हजार २४६ वर आली आहे. ही आकडेवारी पाहता रुग्णसंख्याही ४० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे.

कोरोना आपल्यासाठी पूर्णपणे नवा आहे. त्याची इतर आजारांशी तुलना करता येणार नाही. युरोपात स्वीडनचा अपवाद वगळता इतर देशांत कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी ती आपल्याकडे येईलच असे नाही. मात्र काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

> राज्यात आजपर्यंत एकूण १४,५५,१०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतले घरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७८%

> मे महिन्यापासून १६ टक्क्यांवर असलेला रेट ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात दहापेक्षा कमी होताना दिसतो आहे.

> ९ मार्चला राज्यात आढळला पहिला रुग्ण सप्टेंबर महिन्यापासूनच रुग्णसंख्या कमी होण्यास झाली होती सुरुवात. ऑक्टोबरमध्येही कमी रुग्ण आढळण्याचे प्रमाण कायम.

> राज्य शासनातर्फे केली जाणारी विविध सर्वेक्षणे, सामान्यांकडून घेतली जाणारी काळजी, यामुळे कमी होतोय कोरोना

> सध्या राज्यात 25,03,510 व्यक्ती होम क्वाॅरंटाइन, तर 14,170 व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइन

एक्स्पर्ट व्ह्यू : वेग मंदावला; मात्र, कोरोना संपलेला नाही, येणाऱ्या काळात अधिक काळजी घ्यावी

राज्यात सातत्याने सुरू असलेली सर्वेक्षणे, विषाणूचा मंदावलेला वेग, नागरिकांकडून वारंवार घेतली जाणारी काळजी आणि अनेकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याने वाढलेली सामूहिक प्रतिकारशक्ती यामुळे कोरोनाप्रसाराचा वेग मंदावला आहे. रुग्णांचे आणि बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना संपूर्णपणे संपलेला नाही. सण-उत्सवांच्या काळात सर्व सूचनांचे पालन करून काळजी घेणे गरजेचेच आहे.

बातम्या आणखी आहेत...