आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील रुग्णसंख्या 7 लाखांवर, रुग्णसंख्येत रशियानंतर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीची आज चाचणी

मंगळवारी १०,४२५ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्येने मंगळवारी ७ लाखांचा टप्पा आेलांडला. त्यामुळे रुग्णसंख्येत जगभरात भारत तिसरा क्रमांकावर आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत विचार करता रशियानंतर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला आहे. महाराष्ट्राची रुग्णसंख्या ७,०३,८२३ झाली असून रशियात ९ लाख ६६ हजार रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात ३२९ मृत्यूंची नोंद झाली. मृतांची एकूण संख्या २२,७९४ झाली आहे. मंगळवारी १२ हजार ३०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीची आज चाचणी

पुणे | सीरम इन्स्टिट्यूटच्या बहुप्रतीक्षित कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीची सुरवात बुधवारी करण्यात येणार अाहे. भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे दुपारी १२ ते १ च्या दरम्यान पहिल्या स्वयंसेवकास लस देण्यात येईल. स्वयंसेवक तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर ही चाचणी घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद ३२१ तर जालना जिल्ह्यात ८१ नवे रुग्ण

औरंगाबाद | कोरोनाने मंगळवारी मराठवाड्यात ९४७ नवे रुग्ण आणि २० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. यात सर्वाधिक औरंगाबादेत ७ मृत्यू झाले. बीड ५, नांदेड ४, जालना १ , परभणी २ तर हिंगोलीत एका रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३२१ नवीन रुग्ण आढळले आहेत. लातूर १४१ तसेच परभणी ८५, हिंगोली १३, जालना ८१, नांदेड १२६, बीड ७६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन १०४ रुग्ण आढळले आहेत.