आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:धारावीत प्रथमच कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, राज्यात सध्या 56 हजार 823 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात शुक्रवारी 3431 नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 19.13 लाख

राज्यात शुक्रवारी 3431 नवीन रुग्णांची नोंद झाली. 1427 रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि 71 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 19.13 लाख झाली आहे. यातील 18.06 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 49 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 56 हजार 823 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

धारावीत प्रथमच कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही

मुंबईतील उपनगर आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाहीत. येथे 1 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून असे प्रथमच घडले. धारावीने ज्याप्रकारे कोरोनावर नियंत्रण मिळवले त्या कार्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कौतुक केले होते.

बातम्या आणखी आहेत...