आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात रविवारी आढळले 6059 नवे रुग्ण, तर 112 जणांचा मृत्यू; सध्या 1 लाख 40 हजार रुग्णांवर उपचार सुरू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा रिकव्हरी रेट 88.8 टक्के तर मृत्यूदर 2.63 टक्के

राज्यात मागील 24 तासांत 6059 नवीन रुग्ण आढळले. तर 112 जणांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 16 लाख 45 हजार 20 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी 5648 रुग्णांनी डिस्चार्ज देण्यात आला. यासोबत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14 लाख 60 हजार 755 झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 88.8 टक्क्यांवर गेला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 43 हजार 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 40 हजार 486 रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे.