आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी घट, 3645 रुग्णांची वाढ तर 9905 रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या 16.48 लाख पार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा रिकव्हरी रेट 89 टक्क्यांवर, आतापर्यंत 14.70 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात मागील 24 तासांत रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट पाहण्यास मिळाली. सोमवारी 3645 नवीन रुग्ण आढळले तर 9905 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 84 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16 लाख 48 हजार 665 वर गेली आहे. यातील 1 लाख 34 हजार 137 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 14 लाख 70 हजार 660 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 89 टक्क्यांवर गेला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 43 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.