आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोनाचा घसरणीला लागलेला आलेख कायम, मंगळवारीही आढळलेल्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील कोरोनामुक्तीचा दर 89.39 तर मृत्यूदर 2.63 टक्क्यांवर,

राज्यात कोरोनाचा घसरणीला लागलेला आलेख कायम आहे. राज्यात मंगळवारी 5363 नवीन रुग्ण आढळले. तर 115 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16 लाख 54 हजार 28 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 7836 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत 14 लाख 78 हजार 496 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 31 हजार 544 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 43 हजार 463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.39 टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर 2.63 टक्के एवढा झाला आहे.