आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात गुरुवारी 11,147 नवीन रुग्णांची नोंद तर 8,860 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात दिवसभरात ४८८ रुग्ण, २१ बळी; औरंगाबादेत १९७ रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

राज्यात गुरुवारी 11 हजार 147 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 8 हजार 860 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 4 लाख 11 हजार 798 झाला आहे. तर, 14 हजार 729 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1,48,150 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 2,48,615 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अधिकाऱ्यांसोबत पुण्यातील कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची बैठक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणै दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईवरुन पुण्याकडे 150 किमी स्वतः कार चालवली. दरम्यान, कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींकडून सूचना जाणून घेतल्या.