आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 11,147 नवे रुग्ण; बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण 60 टक्क्यांवर, एकूण रुग्णसंख्या 4 लाख 11 हजार 798

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाडा : ८८८ नवे रुग्ण, १८ जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement

राज्यभरात गुरुवारी एका दिवसात प्रथमच ११ हजार १४७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख ११ हजार ७९८ वर गेली अाहे. दिवसभरात २६६ मृत्यूंची नोंद झाली.

रुग्णसंख्या वाढीसोबतच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत असून गुरुवारी ८,८६० रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे होण्याचे हे प्रमाण ६०.३७ टक्के झाले आहे. आतापर्यंत २,४८,६१५ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. प्रत्यक्ष १ लाख ४८,१५० रुग्णांवर आता उपचार सुुरु आहेत. एकूण १४,७२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मराठवाडा : ८८८ नवे रुग्ण, १८ जणांचा मृत्यू

मराठवाड्यात कोरोनाचा कहर सुरूच असून गुरुवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ६, जालना २, परभणी ४, नांदेड ४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. तर एकूण ८८८ नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी २७६ नवे बाधित आढळले. नव्या रुग्णांमध्ये शहरातील १३२ तर ग्रामीण भागातील १४९ रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबादेतील मृतांमध्ये बीड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर जालना ६८, लातूर ५०, परभणी ३६, बीड ५८, नांदेड ११७, हिंगोली ३०, उस्मानाबाद २५३ रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी सारीमुळेही ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
0