आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात मंगळवारी 12,326 रुग्ण बरे होऊन घरी परतले, 7760 रुग्णांची भर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सध्या 1 लाख 42 हजार 151 रुग्णांवर उपचार सुरू, आतापर्यंत 16,142 जणांचा बळी

राज्यात मंगळवारी सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ७७६० नवीन रुग्णांची तर दिवसभरात ३०० बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ झाली असून कोरोनाबळींची संख्या १६,१४२ वर गेली आहे.

मराठवाडा : ७५३ नवे रुग्ण, १८ मृत्यू

मराठवाड्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत एकूण ७५३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर १८ बाधितांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यात २५६ नांदेड जिल्ह्यात १३७, लातूर १५३,बीड ७५, हिंगोली २, परभणी १७, उस्मानाबाद ४५ तर जालना जिल्ह्यात ६८ रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादेत ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय नांदेड ३, लातूर ४, परभणी ३ तर जालना जिल्ह्यातील दोन मृतांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...