आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात अनेक दिवसांनंतर मृत्यूचा आले अचानक वाढला, बुधवारी 300 रुग्णांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 16.98 लाख पार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील मृत्यूदर 2.62 टक्के तर कोरोनामुक्तीचे प्रमाण 90.68 टक्के

बुधवारी बऱ्याच दिवसांनंतर मृत्यूचा आलेख अचानक वाढला. 24 तासांत 300 लोकांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण मृतांची संख्या 44 हजार 548 झाली आहे. बुधवारी 5505 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 16 लाख 98 हजार 198 झाली आहे. राज्यात बुधवारी 8 हजार 728 रुग्ण बरे होऊन घरी गेले. यासोबतच राज्यात आजपर्यंत एकूण 15 लाख 40 हजार 5 कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 12 हजार 912 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.62 टक्के एवढा आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.68 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 91 लाख 85 हजार 838 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 98 हजार 198 (18.49 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 13 लाख 35 हजार 681 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 11 हजार 648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.