आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी(दि.6) राज्यात 5,368 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 2 लाख 11 हजार 987 झाला आहे. सोमवारी 204 रुग्णांच्या मृत्यूसोबतच राज्यातील एकूण मृतांचा आकडा 9,026 झाला. यात चांगली बाब म्हणजे, सोमवारी राज्यात तब्बल 3,522 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 87,685 रुग्णांवर उपचार सुरू असून, 1 लाख 15 हजार 262 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
औरंगाबादमध्ये 10 ते 18 जुलै दरम्यान संचारबंदी
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे औरंगाबाद मध्ये 10 ते 18 जुलै संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद वाळुज मधील 5 ही एमआयडीसी बंद राहणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी प्रशासन उद्योजक व्यापारी यांची बैठक पार पडली. यामध्ये खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, अंबादास दानवे यांची उपस्थिती होती तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर उदय चौधरी मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे याची उपस्थिती होती. या बैठकीला खासदार इम्तियाज जलील गैरहजर होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाड शहर आजपासून 8 दिवस बंद
दिवसेंदिवस महाड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे सोमवारपासून 8 दिवस महाड शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या 40 नव्या रुग्णांची वाढ; एकूण आकडा 750 वर
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रात्रीपासून जिल्ह्यात तब्बल 40 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 750 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात दररोज वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्याच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
नियम मोडल्यास कडक कारवाई ;प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करू- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
लॉकडाऊन शिथील केला. तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहर तसेच ग्रामीण भागात अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरत नाहीत. कोरोना टाळण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता भटकत आहेत. त्यामुळे प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
8 जुलैपासून हॉटेल्स, गेस्ट हाउस आणि रेस्तरॉ उघडण्यास परवानगी
राज्यात कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात हॉटेल आणि लॉज सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जुलैपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले जाणार आहेत. नुकतेच मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी हॉटेल आणि लॉज सुरु करता येणार नाही.
मुंबईने चीनला टाकले मागे
मुंबईने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकले आहे. मुंबईत सध्या एकूण 84,524 रुग्ण झाले असून 4899 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये 83,553 रुग्ण असून 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सध्या 403 आणि मुंबईत 23,732 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. अर्थात कोरोनाशी संबंधित जवळजवळ प्रत्येक आकडेवारीत मुंबईने चीनला मागे टाकले आहे.
राज्यात 5,205 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मागील 24 तासात 30 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 68 पोलिस कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. तर 4071 कर्मचारी कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांची संख्या 5,205 वर पोहचली असून 1,070 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
पोलिसांना कोरोनापासून वाचवण्यासाठी अधिक चांगल्या धोरणाची आवश्यकता : सोमैया
पोलिसांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भाजप नेता किरीट सोमैया यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले. या पत्रात ते म्हणाले की, मी मरोल कोविड केअर सेंटरचा दौरा आणि तेथे दाखल पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यांना पाहिल्यानंतर असे वाटले की, पोलिसांच्या संरक्षणासाठी अधिक चांगल्या धोरणाची आवश्यकता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.