आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात सोमवारी दिवसभरात 10 हजार 244 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 263 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 14 लाख 53 हजार 653 झाली आहे. यापैकी 2 लाख 52 हजार 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नव्या पेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी 12 हजार 982 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले. यासोबतच एकूण कोरोनामुक्तांची संख्या 11 लाख 62 हजार 585 झाली आहे.
येत्या 12 ऑक्टोबरपासून पुणे आणि लोणावळा दरम्यान लोकल ट्रेन सेवा सुरू होईल. , ही ट्रेन सध्या आवश्यक वस्तू पुरवणाऱ्यांसाठी असणार आहे.
शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सोमवारी स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जाहीर केली. यानुसार सुरुवातीच्या दोन-तीन आठवडे मुलांचे मूल्यांकन होणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक सुरक्षेकडेही शाळेला लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने शाळेत इमर्जन्सी केअर टीम बनवावी लागेल आणि पालकांच्या परवानगी नंतरच मुलांना शाळेत बोलवले जाईल.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने राज्यांवर निर्णय सोपवला आहे की, राज्यातील परिस्थिती पाहून त्यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा. कोणत्याच मुलाला बळजबरीने शाळेत बोलवले जाणार नाही. तसेच, मुलांची जबाबदारी सर्वस्वी शाळेवर असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.