आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोनाची विक्रमी 11,514 रुग्णवाढ; रिकव्हरी रेट 65.94% तर मृत्युदर 3.50%

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24.87 लाख चाचण्यांत आढळले 19.28% रुग्ण

राज्यात गुरुवारी तब्बल ११,५१४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. आजवरची ही एकाच दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. शिवाय ३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७९,७७९ तर बळींची संख्या १६ हजार ७९२ वर गेली आहे. गुरुवारी १०,८५४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा ३ लाख १६,३७५ वर गेला. राज्यात १ लाख ४६,३०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवरच्या २४ लाख ८७,९९० चाचण्यांत १९.२८% लाेकांना कोरोनाचे निदान करण्यात आले.

मराठवाडा : तब्बल ३२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद | मराठवाड्यात गुरुवारी ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. जालन्यात ८, नांदेड ६, परभणी ५, तर लातूरलाही एका रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, जालन्यात ७७, लातूर १७०, बीड १०८, नांदेड १६८, हिंगोली ५८, परभणी ८२ तर उस्मानाबाद जिल्ह्यात विक्रमी १९१ रुग्ण वाढले आहेत.

औरंगाबाद : २८३ रुग्ण, १२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी काेराेनाचे आणाखी २८३ रुग्ण सापडले. एकूण काेराेनाग्रस्तांची संख्या १५ हजार ७७४ झाली आहे. दिवसभरात १२ रुग्णांच्या मृत्यूची नाेंद झाली. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ५०९ झाली आहे. आतापर्यंत एकूण ११ हजार ६७६ जण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या ३,५८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.