आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात मंगळवारी 12 हजार 158 नवीन कोरोनारुग्णांची नोंद झाली. तर 370 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या 14 लाख 65 हजार 911 झाली आहे. दरम्यान मंगळवारी 17 हजार 141 लोक बरे होऊन घरी गेले. यासोबत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 11 लाख 79 हजार 726 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 80.48% एवढा आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 38 हजार 717 झाला असून मृत्यूदर 2.64% एवढा झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 37 हजार 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातल्या सरासरी मृत्यूदरापेक्षा राज्यातला मृत्यूदर अद्यापही जास्त आहे. देशात आणि अन्य राज्यांमध्येही कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी राहिले आहे. महाराष्ट्रात अद्यापही मृत्यूदर अडीच टक्क्यांहून अधिक आहे.
आतापर्यंत 24 हजार 254 पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात मागील 24 तासांत 104 पोलिसांनी कोरोनाची लागण झाली तर 2 पोलिसांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 24 हजार 254 पोलिस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले. यातील 21 हजार 423 पोलिस बरे झाले असून 2,578 जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 253 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हानिहाय अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी
पुणे - 58868
ठाणे -31009
मुंबई - 26003
नाशिक - 13552
नागपूर - 10964
औरंगाबाद - 10025
सातारा - 8776
6 ऑक्टोबरची आरोग्य विभागाने दिलेली आकडेवारी
अॅक्टिव्ह रुग्ण - 2,47,023
24 तासांतली वाढ - 12,258
24 तासांतले मृत्यू - 370
एकूण रुग्णसंख्या - 1465911
एकूण मृत्यू - 38717
कोरोना आटोक्यात येईपर्यंत राज्यातील कॉलेज बंदच, ग्रंथालये लवकरच सुरू : मंत्री उदय सामंत
पुणे | राज्यात महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. मात्र कोविड परिस्थिती संपुष्टात येईपर्यंत राज्यात कॉलेज सुरू करणे शक्य नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यातील अभ्यासिका आणि ग्रंथालये सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच ग्रंथालये सुरू करण्यात येतील, असे ते म्हणाले.सामंत यांनी मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.