आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले, बुधवारी 16 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या 14.80 लाख

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा रिकव्हरी रेट 80.81 टक्के तर मृत्यूदर 2.64 टक्के एवढा झाला आहे

राज्यात बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. बुधवारी 14 हजार 578 नवीन रुग्णांचे निदान झाले. 16 हजार 715 रुग्ण बरे झाले. कला 355 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.64 एवढा झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 14 लाख 80 हजार 489 झाली. तर एकूण मृत्युसंख्या 39 हजार 72 वर पोहोचली आहे. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 11 लाख 96 हजार 441 झाली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) 80.81 टक्क एवढा झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 44 हजार 527 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...