आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:5 लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला : शनिवारी दिवसभरात 11,081 बरे, 12,822 नवे कोरोनाग्रस्त, 275 मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील एकूण रुग्णसंख्या 5,03,084 वर, तर एकूण 17,367 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले

राज्याने शनिवारी ५ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात विक्रमी १२ हजार ८२२ नव्या बाधितांची नोंद झाली असून २७५ मृत्यू झाले. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे ११ हजार ८१ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५,०३,०८४ वर गेली आहे. त्यापैकी ३ लाख ३८,३६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १,४७,०४८ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर एकूण १७,३६७ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत.

मराठवाड्यात कहर : ११६९ पॉझिटिव्ह, २३ मृत्यू; औरंगाबाद ३७७, जालना ८८

मराठवाड्यात शनिवारी सायंकाळपर्यंत ११६९ नवे कोरोनाबाधित तर तब्बल २३ मृत्यूंची नोंद झाली. यापैकी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ३७७ रुग्ण आढळले असून १३ मृत्यू झाले आहेत. १८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात मनपा हद्दीतील ७४ आणि ग्रामीण भागातील ११२ रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित मराठवाड्यात ७९२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १० जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात २३२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात ८८ नवे रुग्ण आढळले. ५ जणांचा मृत्यू झाला. बीड ८६ नवे रुग्ण आढळले तर तिघांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात ७ नवे तर एका बाधिताचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात ११४, लातूर जिल्ह्यात १८४ तर परभणी जिल्ह्यात ८१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...