आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात एकाच दिवशी विक्रमी 32 हजार रुग्ण बरे; 15,738 नवे रुग्ण, बळींच्या संख्येने ओलांडला 33 हजारांचा टप्पा

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकूण रुग्णसंख्या 12 लाख 24 हजार 380, तर 2 लाख 74 हजार 623 रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात सोमवारी ३२,००७ कोरोनामुक्त रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट नोंदवली गेली. तसेच संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर गेल्या सहा महिन्यांत प्रथमच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण आता ७४.८४ टक्क्यांवर गेले आहे.

सोमवारी १५,७३८ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर ३४४ मृत्यूंची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या आता १२,२४,३८० झाली आहे, तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९,१६,३४८ झाली आहे. सध्या २,७४,६२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबळींच्या संख्येने ३३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील मृतांची एकूण संख्या आता ३३ हजार १५ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...