आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात विक्रमी 17,433 नवे रुग्ण; रुग्णांची एकूण संख्या 8 लाख 25,739, तर मृतांचा आकडा 25 हजार 195 वर

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सध्या 2 लाख 1,703 अॅक्टिव्ह रुग्ण, रिकव्हरी रेटही 72.48%

राज्यात बुधवारी रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला. दिवसभरात १७,४३३ नवे रुग्ण, तर २९२ मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ८ लाख २५,७३९, तर बळींचा आकडा २५,१९५ वर गेला आहे. बुधवारी १३,९५९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आता एकूण कोरोनामुक्तांची संख्या ५ लाख ९८,४९६ वर गेली असून रिकव्हरी रेटही ७२.४८% इतका झाला आहे. राज्यात सध्या २ लाख १,७०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मराठवाड्यात ३३ बळी

मराठवाड्यात बुधवारी ३३ रुग्णांचा मृत्यू, तर १६०८ नवे रुग्ण आढळले. विभागात एकूण १८३६ रुग्णांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ५९,९५८ झाली आहे.

परभणी २, नांदेड ६, बीड ३, लातूर ९, उस्मानाबाद ४, औरंगाबाद जिल्ह्यात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच परभणी १११, हिंगोली ३२, जालना १२९, नांदेड ३८०, बीड ११७, लातूर ३१५, उस्मानाबाद २०४, तर औरंगाबाद जिल्ह्यात ३२० नवे रुग्ण आढळले.

0