आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा फटका आता एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेलाही बसला आहे. पुण्यात परीक्षेची तयारी करणाऱ्या श्रीगाेंदा व सांगली येथील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊन जीव गमवावा लागल्याने राज्य सरकारने ११ एप्रिल रोजी होत असलेली ही नियोजित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची प्रचंड दहशत आहे. दुसरीकडे अनेक शहरांतील रुग्णालयाेत उपचारासाठी जागा मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यातील हजारो मुले पुण्यात राहतात. यातील दोघांचा मृत्यू झाला. तर, यादरम्यानच्या काळात पुण्यासह इतर शहरांत अनेक विद्यार्थी काेराेनाबाधित झाल्याने राज्य सरकारने ११ एप्रिल रोजी नियोजित परीक्षा स्थगित केली. दरम्यान परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विद्यार्थ्यांत दोन गट असून परीक्षा वेळेतच घेणे गरजेचे हाेते, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे अाहे.
अभ्यासिका, भाड्याने राहत असलेली खोली, विविध पुस्तक हाताळणी, मेस-नाष्टा ठिकाण येथे कोरोना होण्याचा धोका वाढला असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विदयार्थी कोरोनाबाधित झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या संपर्कातील इतर जणांना क्वारंटाइन व्हावे लागत आहे. अशा प्रसंगी अभ्यास करण्याची मानसिकता राहत नाही. लॉकडाऊनमुळे बस, एस टी सेवा बंद आहेत, परीक्षा केंद्र दूर असल्यास कसा प्रवास करायचा, याचा विचार शासनाने केला पाहिजे. वेळेत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले नाहीत तर त्याला जबाबदार कोण आहे? विदार्थाना परीक्षा केंद्रावर कोरोना लागण झाली तर त्यास कोण जबाबदार? याबाबत सरकारने विचार करून परीक्षा सुरक्षितता लक्षात घेऊन नंतर घ्यावी, अशी भावना विदयार्थी व्यक्त करत हाेते.
दुसऱ्या बाजूला एमपीएससी परीक्षा आधीच दोन वर्षांत वेळेत होत नसल्याने ती ठरलेल्या दिवशी घेणे गरजेचे हाेते. प्रामाणिकपणे परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी दरराेज तासनतास अभ्यास करत असल्याचे सांगत काही परीक्षार्थी म्हणाले, परीक्षा होऊ नये याकरिता काहीजण राजकारण करत असून विद्यार्थी संघटना मुलांच्या अभ्यासाऐवजी राजकीय पोळी भाजत आहेत. परीक्षा पुढे ढकलल्यास त्या लवकर पुन्हा कधी होतील याची शाश्वती नाही आणि विद्यार्थीची अजून प्रतीक्षा करण्याची मानसिकता उरलेली नाही.
हा निर्णय योग्यच...
पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेचे सचिव अाणि ज्ञानदीप स्पर्धा परिक्षा केंद्राचे संचालक महेश शिंदे म्हणाले, शासनाने एमपीएस्सीची परीक्षा पुढे ढकलली हा याेग्य निर्णय अाहे. पुण्यातील परिस्थिती मागील १५ दिवसात झपाटयाने बदलली असून दरराेज हजाराे काेराेनाबाधित वाढत अाहेत. अशावेळी विद्यार्थ्यांचे अाराेग्य महत्त्वाचे आहे.
राज्यात पूर्ण लाॅकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्री करणार सर्व नेत्यांशी चर्चा
तीन आठवड्यांचा हा लॉकडाऊन कडक स्वरूपाचा असायला हवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केली. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने गेल्या सोमवारपासून कठोर निर्बंध लादले आहेत. शनिवार व रविवार या दिवशी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. सर्व घटकांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला विरोध होत आहे. निर्बंध शिथील करावेत अशी मागणी होत आहे. मात्र, तसे होण्याची शक्यता नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात करोना रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे. दिवसागणिक ५० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. आरोग्य सुविधांवर ताण येताे आहे. एका बाजूने आरोग्य यंत्रणा लसीकरणात गुंतली असताना वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आरोग्य सेवा पुरवणे हे आव्हान होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.