आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र:गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका, आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लढाई आणखी प्रखरपणे लढण्यासाठी डॉक्टरांची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे
  • लॉकडाउनची तारीख वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
  • 'दररोज 6 ते 7 लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत आहोत'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 21 दिवसांचा लॉकडाऊन 3 एप्रिलपर्यंत वाढवला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधला. संबोधनाच्या सुरुवातील मुख्यमंत्र्यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन, सर्व भीमसैनिकांचे आभार मानले. ते म्हणाले की, भीम जयंतीला सर्व भीमसैनिक मुंबईला येतात, पण यावेळेस त्यांनी शिस्तीचे पालन करुन घरात जयंती साजरी केल्याबद्दल त्यांचे मनातून आभार. 

राज्यातील परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज

पुढे ते म्हणाले की, त्या काळात बाबासाहेबांनी विषमतेविरोधात लढा दिला. आज आपल्याला विषाणूविरोधात लढा द्यायचा आहे. आपण इतक्या दिवस एकजुट राहुन ज्याप्रकारे आपली एकी दाखवली आहे, त्याचप्रमाणे पुढेही दाखवाल अशी आपेक्षा. मी सकाळीच बोलणार होतो, पण पंतप्रधान बोलणार असल्यामुळे मी नंतर बोलण्याचे ठरवले. सधअया राज्यातील परिस्थिती आपल्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की, तुमच्या मदतीने आपण सर्वजण हा लढा जिंकू. राज्य सरकार खंबीर आहे, वाटेल ते करुन हा आजार राज्यातू हद्दपार केला जाईल. सध्या राज्यात रोज हजारो चाचण्या होत आहे. इतर राज्यात झाल्या नसतील तितक्या चाचण्या रोज राज्यात घेतल्या जात आहेत. आज पंतप्रधानीं 3मे पर्यंत लॉकडाउ वाढवला. धन्यवाद हा लढा फार गांभीर्याने घ्यायला पाहीजे. संपूर्ण राज्यातील बांधवांनी लढा सुरू केली आहे. या एकजुटीमुळे मला आत्मविश्वास आहे की आपण जिंकणार.  सकाळी बोलणार होतो, पण पंतप्रधान बोलत होते. राज्यात इतर कुठेही झाल्या नसतील इतक्या चाचण्या झाल्या. मी सातत्याने सांगतोय राज्य सरकार खंबीर आहे. शक्य ते आपण करत आहोत. 

'कोरोनातून ठीक होताना मी पाहिल आहे'

''मी कोरोनाला मात दिलेल्या 6 महिन्याच्या बाळाला आणि 83 वर्षांच्या वयोवृद्धांना बरं होताना पाहिलं आहे. तुम्हालाही हे माहिती असेल, याच्या बातम्याही आल्या आहेत. त्यामुळे कोरोनातून बरं होता येतो. डॉ. ओक यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ते कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहेत. कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याबाबतची घोषणा केली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पहिल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं. मोदींनी देशातील कोरोनाची स्थिती पाहता देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली, त्याबद्दल त्यांचे आभार.''

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरू राहील

''ही लढाई आणखी प्रखरपणे लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. हे काय करणार तर ट्रिटमेंटची गाईडलाईन ठरवणार आहेत. यात अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. काही खासगी क्षेत्रातले डॉक्टर आहेत. एक चांगलं काम या टीमने सुरु केले आहे. करोनाची लागण झालेली व्यक्ती सापडली की त्यांच्या थेट संपर्कातल्या लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जातं आहे. त्यांच्यापासून प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. काही वेळा गैरसोय होते मात्र ती लवकरात लवकर दूर करुन आपण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु केला आहे.''

''लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाहीये. परराज्यातील कामगारांनी घाबरुन जाऊ नये. आज वांद्र्यात जे काही घडलं ते काही लोकांनी पिल्लू सोडल्यामुळे घडलं असेल. त्यामुळे अनेकांना वाटलं असेल की आजपासून ट्रेन सुरु होतील आणि आपल्याला घरी जाताल येईल. पण मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की तुम्ही घाबरुन जाऊ नका आणि मुंबई सोडू नका. महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांच्या पाठिशी उभा आहे. महाराष्ट्रात तुम्ही सुरक्षित आहात. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका''

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

- महाराष्ट्रात अडकलेल्या कामगारांना भिण्याचे काहीच कारण नाही, सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ.

- गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका, आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असे काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.

- कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असे सूचवत आहेत, पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये.

- दररोज 6 ते 7 लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत आहोत.

- कोव्हिढ योद्ध्यासाठी नाव देण्याचे आवाहन केल्यानंत 21 हजार लोकांनी नावे नोंदवली आहे

. - प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी लसीचा प्रयोग करण्याची परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती केंद्राला केली आहे.

- कोरोनानंतर आर्थिक आघाड्यांवर कसे पुढे जायचे यावर अर्थतज्ज्ञांची एक समिती तयार केली आहे.

- महाराष्ट्रात 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाला प्रवेश करू दिला नाही.

- शेतकऱ्यांना कुणीही थांबवणार नाही अशी ग्वाही देतोय.

- 20 तारखेनंतर काय काय सुरू करता येईल याचा सरकार अंदाज घेत आहे.

- कोरोनानंतर आणखी एक मोठं संकट येणार आहे हे संकट आर्थिक असेल.

- 20 एप्रिलनंतर कोणते उद्योग सुरु करता येतील यावर अजित पवार आणि त्यांची समिती निर्णय घेईल.

- मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये अधिक काळजी घेतली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...