आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात रविवारी तब्बल 2347 नवीन रुग्णांची नोंद, तर 63 रुग्णांचा मृत्यू; एकूण आकडा 33,053 वर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात आतापर्यंत 7 हजार 688 रुग्ण कोरोनामुक्त

रविवार(दि.17) महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा सर्वाधिक झाला आहे. राज्यात रविवारी तब्बल 2347 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यासोबतच राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या 33 हजार 053 झाली आहे. हा राज्यातील एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे. या आरड्यासोबतच रविवारी राज्यात 63 रुग्णांचा मृत्यू झाला असू, एकूण मृतांची संख्या 1198 झाली आहे. राज्यातील एकट्या मुंबईत 20 हजारांपेक्षा जास्त कोरोना संक्रमित आहेत. तसेच, येथे 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील सर्वाधिक कोरोना प्रभावित शहर मुंबई आणि पुणे येथे केंद्रीय सुरक्षा दल तैनातीस सुरुवात झाली आहे. पुण्यात शनिवारी सुरक्षा दलांनी शहरातील काही भागात मार्च देखील केला. राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने केंद्रीय सुरक्षा दलाच्या 20 कंपन्या महाराष्ट्रात पाठविल्या आहेत. राज्यात कोरोना संकटात सतत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना थोडी विश्रांती देण्यासाठी केंद्रीय मुंबई, पुणे, मालेगाव, अमरावतीसह अन्य शहरांमध्ये सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत.राज्यात सलग 11 व्या दिवशी एक हजारच्या वर नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 1606 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 30.706 वर गेली आहे. शनिवारी 67 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला. यातील 22 बळी हे गेल्या 24 तासांतील असून इतर मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत.

थांबत नाहीये कामगारांचे स्थलांतर 

आज लॉकडाउन 3 चा शेवटचा टप्पा आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज नंतर सरकार लॉकडाऊन नियमात बरीच सवलत देऊ शकते. असे असूनही कामगारांचे स्थलांतर थांबण्याचे नाव घेत नाही. यातच नागपुरमध्ये कामगार मोठ्या संख्येने ट्रकमधून आपल्या घरी जाताना दिसले. येथे एक कामगार म्हणाला की, "लॉकडाउन सुरू झाल्यानंतर आम्ही बर्‍याच अडचणींचा सामना केला. सोशल डिस्टेन्सिंगचे पालन केले. संपूर्ण वेळ मास्क घातले होते. पण आता ट्रकमध्ये असा प्रवास करणे आता शक्य नाही."

दिल्लीतून 1345 यूपीएससी विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार

दिल्लीत यूपीएससीची तयारी करत असलेले महाराष्ट्रातील 1345 विद्यार्थी आज राज्यात परतणार आहेत. एक विशेष रेल्वे या विद्यार्थ्यांना घेऊन शनिवारी सायंकाळी रवाना झाली. त्यांना आणण्याचा पूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलत आहे. रेल्वेस्टेशनवर जाण्यापूर्वी राजघाट परिसरातील आंबेडकर स्टेडियमवर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी झाली. दिल्लीहून पुण्याकडे निघालेली ही रेल्वे भुसावळ, कल्याण, नाशिक असे 3 थांबे घेणार आहे. आधी 30 मे रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा होणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलली आहे.

बातम्या आणखी आहेत...