आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात मंगळवारी 6,741 रुग्णांची वाढ, तर 213 रुग्णांचा मृत्यू; ठाणे बनला देशातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र मुंबईच्या मलाडमधील कुरार गावचे आहे. आरोग्य कर्मचारी पीपीई किट परिधान करून घरोघरी पाहणी करत आहेत
  • मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात, सर्वाधिक 70 टक्के रुग्ण बरे, 100% लॉकडाउनची गरज नाही

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी(दि.14) राज्यात 6,741 रुग्णांची वाढ झाली, तर 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 2 लाख 67 हजार 665 झाला आहे, तर 10 हजार 695 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे, आज राज्यात 4,500 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 1 लाख 07 हजार 665 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 1 लाख 49 हजार 007 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आकडेवारी www.covid19india.org नुसार आहे.

मुंबईत 70 टक्के रुग्ण बरे झाले 

मुंबईत सर्वाधिक 70 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 95,100 झाली आहे. आतापर्यंत 66,623 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मुंबईत मागील 24 तासांत 64 रुग्णांचा मृत्यू झाला. 

मुंबईचा कापड बाजार 4 महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाला

राज्यात एकीकडे पुण्यासह अनेक शहरांत कडक लॉकडाउन लावण्यात येत आहे. बीएमसीच्या सी वॉर्डअंतर्गत येणाऱ्या बहुतांश कापड मार्केट सुमारे 4 महिन्यांच्या दीर्घकाळानंतर पुन्हा सुरू झाले. सोमवारी स्वदेशी, मंगलदास, एमजे मार्केटसह प्रमुख कापड सुरू झाले. मात्र या मार्केटमध्ये पहिल्यासारखी गर्दी दिसली नाही. मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी व्यावसायिक, त्यांचा स्टाफ आणि ग्राहकांच्या तापमानाची तपासणी करण्यात आली. हे मार्केट सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरू राहणार आहे.

ठाणे देशातील नवीन हॉटस्पॉट बनले

ठाणे आता देशातील सर्वात मोठे कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. येथे सध्या मुंबईपेक्षा जास्त रुग्ण दररोजच्या तुलनेत समोर येत आहेत. जुलै महिन्यात ठाण्यात दररोज सुमारे 2 हजार केस समोर आल्या. ठाण्यातील रुग्णसंख्या 57 हजारांपेक्षा जास्त आहे. यातील बहुतांश रुग्ण ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन महानगरपालिकांमध्ये आहेत. भिवंडीमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 5.5 टक्के आहे.

बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करावी- मुख्यमंत्री

सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे  आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले,त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने , जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते आज बकरी ईद संदर्भात आयोजित ऑनलाईन  बैठकीत बोलत होते.

मुंबईत 100% लॉकडाउनची गरज नाही

बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मुंबईतील रिकव्हरी दर 70 टक्के झाला आहे आणि रुग्ण दुप्पट होण्याचा दर 50 दिवसांपेक्षा अधिक आहे. पुढील काही दिवसांत यामध्ये आणखी सुधारणा होण्याची आशा आहे. यामुळे मुंबईत 100 टक्के लॉकडाउन लागू करण्याची कोणताही आवश्यकता नाही.