आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:संक्रमितांचा एकूण आकडा 3.47 लाखांवर; यातील 1.94 लाख रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील मालाड भागात तैनात असलेल्या पोलिसांची तपासणी करताना बीएमसीचे आरोग्य कर्मचारी.
  • गुरुवारी 9,895 नवीन रुग्णांची नोंद, तर 298 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 3.47 लाखांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी राज्यात 9 हजार 895 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 3 लाख 47 हजार 502 झाला आहे. गुरुवारी झालेल्या 298 मृत्यूसोबत मृतांचा एकूण आकडा 12,854 वर पोहचला आहे. दरम्यान, गुरुवारी 6,484 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात 1 लाख 40 हजार 093 रुग्णांवर उपचार सुरू असून, 1 लाख 94 हजार 253 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्याला इम्तियाज जलील यांचा विरोध

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व सण उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध आणले आहे. याच  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता याला एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांना हे सर्व मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बकरी ईदच का प्रतिकात्मक साजरी करायची? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. 

मुंबई आणि पुण्यातील 5 हजार लोकांवर होणार ट्रायल

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना व्हॅक्सीनच्या निकालांमध्ये समाधानकारक परिणाम मिळाल्यानंतर आता यूकेमध्येही मोठ्या प्रमाणात ट्रायल सुरू केले आहेत. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि सीरम इंस्टिट्यूटच्या व्हॅक्सीनचे ट्रायल सर्वात आधी पुणे आणि मुंबईतील हॉटस्पॉट झोनमध्ये राहणाऱ्या पाच हजार लोकांवर होणारआहे. व्हॅक्सीनचे स्थानिक उत्पादन सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने आशा व्यक्त केली आहे की, सर्वकाही ठीक राहिल्यास पुढील वर्षापर्यंत व्हॅक्सीन लॉन्च होईल.

पुणे आणि मुंबईमध्ये सर्वात जास्त हॉटस्पॉट

पुण्यात बुधवारपर्यंत 59,000 पेक्षा जास्त, तर मुंबईत 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण झाले आहेत. राज्यभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण या दोन शहरात आहेत. सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले की, मुंबई आणि पुण्यातील अनेक ठिकाणांना आम्ही व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी शॉर्टलिस्ट केले आहे. या शहरात सर्वात जास्त हॉटस्पॉट आहेत.

बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात संतप्त जमावाने रुग्णवाहिका पेटवली

बेळगावच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने रुग्णवाहिका पेटवून दिली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या खासगी वाहनांवरही दुकान दगडफेक करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त के. त्यागराजन तसेच जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर स्पीड लिमिट, नियम मोडल्यास 1 हजारांचा दंड

संक्रमण कालावधीत देशातील पहिल्या एक्स्प्रेस वे म्हणजेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवासी नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एक्सप्रेस वेवर आता गती मर्यादा लागू करण्यात आली आहे. जर कोणी नियम मोडला तर त्याला 1 हजार रुपये दंड ठोठावला जाईल.

37 मिनिटांत 50 किमीचा प्रवास होईल पूर्ण

रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि पुणे जिल्ह्यातील उर्स टोल प्लाझा दरम्यान जवळपास 50 कि.मी. अंतर आहे  आणि कोणत्याही वाहनास निर्धारित गती मर्यादा पार करण्यासाठी 37 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागायला नको. या वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला जाईल आणि ई-चालान पाठविला जाईल. अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे

पहिला दंड 1 हजार रुपये असेल 

मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टपासून या एक्सप्रेसवेवर गती मर्यादेचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास 1000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. तसेच वारंवार अशी चूक केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. 94 किलोमीटर लांब असलेल्या या मार्गावर गती मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास अशी ठेवण्यात आली आहे.