आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:शुक्रवारी 9,615 नवीन रुग्णांची नोंद तर 278 रुग्णांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 3.57 लाखांवर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील दादर भागात बाहेर फिरणाऱ्या लोकांची चौकशी करताना पोलिस. येथे विनाकारण फिरणाऱ्यांना दंडही ठोठावण्यात येत आहे
  • राज्याचा रिकव्हरी रेट 55.9% कोरोना मृत्युदर 3.7%

राज्यात शुक्रवारी(दि.24) 9,615 नवीन रुग्णांची नोंद तर 278 रुग्णांचा मृत्यू. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 3 लाख 57 हजार 117 वर. तसेच, एकूण मृतांचा आकडा 12,132 वर. चांगली बाब म्हणजे, आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या राज्यात 1 लाख 43 हजार 714 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना रुग्णांचे बिल आधी ऑडिटरकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. पवारांनी नाशिकमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. 'सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना दिल जाईल', अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

यावेळी बोलताना टोपे म्हणाले की, 'राज्यात 3000 आरोग्य कर्मचारी उपलब्ध करणार आहोत. खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून जास्त बिल आकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत अत्यंत स्पष्ट सूचना आहेत, सरकारी ऑडिटर ऑडिटर्सला एक-एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. जे बिल हॉस्पिटल देईल ते आधी ऑडिटर्सकडे तपासणीसाठी जाईल. ऑडिटरने तपासल्यानंतर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जी रुग्णालये ठरली आहेत, त्यातील उपचार मोफत होत आहेत की नाही, हे सगळे ऑडिटर तपासेल. त्यानंतर ते बिल रुग्ण आणि नातेवाईकांना दिले जाईल,' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.

नागपुरात आता लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यूची घोषणा

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात नागपूर शहरही मागे नाही. येथे रुग्ण वाढायला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीव शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. 25 आणि 26 जुलै असे दोन दिवस हा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिका प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.