आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योग मंत्र्यांचे संकेत:महाराष्ट्रातील रेड झोन जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यात उद्योग-धंदे सुरू करण्यास परवानगी मिळू शकते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याच्या औद्योगिक स्थितीची माहिती घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कृती दलाची बैठक मंत्रालयाच झाली

राज्यातील मुंबई-पुणे आणि रेड झोन असलेल्या जिल्ह्यांना सोडून इतर काही जिल्ह्यात उद्योग-धंदे सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंबंधी प्रस्ताव मांडण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर राज्याची औद्योगिक स्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्ती कृती दलाची बैठक सोमवारी मंत्रालय झाली.

शेती संबंधी काही उद्योग सुरू होऊ शकतात

उद्योग मंत्री देसाई यांनी सांगितले की, उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, मुंबई-पुणेसारख्या रेड झोन जिल्ह्यांना सोडून इतर काही जिल्ह्यांमध्ये उद्यो सुरू करण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. देसाई पुढे म्हणाले की, विशेष करुन शेती संबंधी उद्योगांना सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेमध्ये काही अडचण येणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर निर्णय घेतला जाईल

देसाई पुढे म्हणाले की, राज्यातील लघु उद्योगातील मजुरांना दोन महिन्यांची पगार देण्यासाठी बँकांनी आपली कर्ज देण्याची मर्यादा वाठवावी. यासाठी केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा. एमआयडीसीसंबंधित मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंजूरीनंतरच निर्णय घेण्यात येईल. बैठकीकीला उद्योग विभागाचे मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन आणि उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळेसह अनेक अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राला तीन झोनमध्ये वाटण्यात आले

रेड झोन: मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद.

ऑरेंज झोन: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव,

उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि गोंदिया.

ग्रीन झोन: धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड़, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरौली. 

बातम्या आणखी आहेत...