आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1000 मृत्यू वाला महाराष्ट्र:मागील 6 दिवसांपासून दर 2 दिवसात झाले 100 मृत्यू, देशातील 32% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1019 मृतांमध्ये 383 म्हणजेच 38% महिला आणि 636 म्हणजेच 62% पुरुष आहेत

राज्यातील कोरोना संकटाने गंभीर रुप धारण केले आहे. मागील 2 दिवसा राज्यात शंभरपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 1019 वर गेला असून, राज्यात 27 हजार 524 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 3.70% चा मृत्यू दर आहे. तर, देशातील मृत्यू दर 3.23% आहे.

17 मार्चला पहिल्या कोरोना संक्रमिताचा मृत्यू 

राज्यातील पहिल्या कोरोना संक्रमिताचा मृत्यू 17 मार्चला झाला होता. त्यानंतर 13 अप्रैल एप्रिल म्हणजेच 24 दिवसात मृतांचा आकडा 100 वर गेला. त्यानंतर मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढले. फक्त 34 दिवसात मृत्यूचे प्रमाण 10 पटीने वाढून 1000 पर्यंत पोहचले. यात 55 % मृत्यू मे महिन्यातील 14 दिवसात झाले आहेत. मृतांचा आकडा 800, 900 आणि आता 1000 वर पोहचण्यात फक्त 2-2 दिवसांचा वेळ लागला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्रानंतर गुजरातचा नंबर लागतो. राज्यात आतापर्यंत 566 रुग्णांचा बळी गेला आहे.

मे महिन्यात सरासरी दररोज झाला 50 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रातील संक्रमणाचे पहिले प्रकरण 9 मार्चला समोर आले होते, तर पहिला मृत्यू  17 मार्चला झाला. संक्रमणामुळे 31 मार्चपर्यंत राज्यात 10 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 302 प्रकरणे समोर आले. त्यानंतर संक्रमण इतक्या वेगाने वाढले की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संक्रमण आणि मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील नंबर एकचे राज्य बनले. देशातील एकूण संक्रमणापैकी 32% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे, तर 38% मृत्यू. मे महिन्यात मृत्यूचा नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे, आता जररोज 50 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे.

राज्यातील कोरोना संक्रमित 850 रुग्णांची परिस्थिती गंभीर

23314 रुग्णांच्या अॅनालिसिसमधून समोर आले आहे की, कोरोना संक्रमित 51% रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून येत नाहीयेत. परंतू, त्यांच्या चाचणीमध्ये कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी होत आहे. 17% रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षमे दिसत आहेत. तसेच, 4 % म्हमजेच 850 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. तर 24% म्हणजेच 5538 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आकडेवारी काल(दि.14) पर्यंतची आहे.

बातम्या आणखी आहेत...