आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Coronavirus News; BJP MLA Mihir Kotecha Allegation On Uddhav Thackeray, Says Food Grains Rot As Poor Battle Hunger; News And Live Updates

मुंबईतील धान्य वितरणामध्ये मोठी गडबड:गोदामात 1800 टन डाळी सडल्याचा भाजप आमदाराचा आरोप; भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारने वाटपाची परवानगी दिली नाही

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी आपल्या कार्यकर्तासह मुंबईतील मुलुंडमधील एका गोदामावर छापा टाकला होता.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंर्तगत विविध राज्यांना कोरोनाकाळात डाळी, गहू व अन्य वस्तूंचा पुरवठा केला जात होता. दरम्यान, भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी मुंबईतील एका गोदामामध्ये छापा टाकत शेकडो टन धान्य सडल्याचा आरोप केला. ते पुढे बोलताना म्हणाले की, शहरातील या एका गोदामात 1800 टन डाळी सडली असेल तर इतर गोदामाचेदेखील हेच हाल असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपल्या कार्यकर्तासह मुंबईतील मुलुंडमधील एका गोदामावर छापा टाकला होता. भाजप आमदार कोटेचा यांनी संबंधित प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी व्हावी याकरीता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यासोबतच अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली आहे. परंतु, या गोष्‍टीचे खंडन करताना अन्न व पुरवठा मंत्री भुजबळ यांनी केंद्र सरकारच आपल्याला याची परवानगी दिली नसल्याचे ते म्हणाले.

ऑक्टोबरपासून गोदामात सडत होती डाळ - आमदार मिहिर कोटेचा
भाजप आमदार कोटेचा यांनी आरोप करताना सांगितले की, राज्यात ही डाळ गेल्या ऑक्टोबरपासून सडत आहे. कोटेचा यांच्या मते, ही डाळ केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेतून राज्याला सहाय्य म्हणून दिली होती. परंतु, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे एवढी मोठी डाळीचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात त्यांनी संबंधित विभागातील आधिकारी आणि मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने डाळ वाटपाची परवानगी दिली नाही - छगन भुजबळ
कोटेचा यांचा आरोप फेटाळून लावताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, ही डाळ केंद्र सरकाराकडून मिळाली असून केंद्राने यासाठी परवानगी दिली नव्हती. परंतु, नंतर केंद्र सरकारने 15 एप्रिल धान्य वितरण करण्यास मंजूरी दिली. त्यामुळे शिल्लक डाळी लवकरात लवकर वितरित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...