आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात मदत करणारा योद्धा:मुंबईतील रुग्णांना मोफत घर ते हॉस्पिटल आणि हॉस्पिटल ते घरांपर्यंत पोहचवण्याचा काम करत ऑटो चालक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जास्तीतजास्त गरीब लोकांना पोहचवत आहे रुग्णालयात

राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, काही लोकांना वेळेवर उपचारासाठी रुग्णवाहिका, बेड, व्हेंटिलेटर मिळत नसल्यामुळे रुग्णांचा तडफडून मृत्यू होत आहे. परंतु, यात काही लोक असेही आहेत जे निस्वार्थ भावनेने काम करत आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दुसर्‍या लोकांचा जीव वाचवत आहे. मुंबईतील दत्तात्रय सावंत हे स्वखर्चाने मुंबईतील रुग्णांची घरापासून हॉस्पिटल आणि हॉस्पिटलपासून घरापर्यंत ने-आण करतात. दरम्यान, सावंत यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा पोहचवला आहे.

दुसरा लॉकडाऊनपासून चालवत आहे ऑटो
विशेष म्हणजे दत्तात्रय सावंत हे शिक्षक असून घाटकोपर येथील दन्या सागर विद्या मंदिरात 8 व 10 च्या विद्यार्थांना इग्लिंश हा विषय शिकवतात. सावंत यांनी सांगितले की, राज्यात दुसर्‍या लॉकडाऊनची घोषणा होताच मी ऑटो चालवायला सुरुवात केली. ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात जोपर्यंत कोरोनाचा प्रार्दुभाव राहील तोपर्यंत ही सेवा सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जास्तीतजास्त गरीब लोकांना पोहचवत आहे रुग्णालयात
सावंत यांनी सांगितले की, याकाळात एकिकडे रुग्णवाहिका मिळत नाही आहे. मिळालाची तर पैशाची मोठी मागणी केली जाते. त्यामुळे गरीब लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची लूट सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी अशाच लोकांना मदत पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे.

संसर्ग वाढू नये यासाठी रुग्णांना सोडल्यानंतर ऑटोला सॅनिटाईज करीत असतो
संसर्ग वाढू नये यासाठी रुग्णांना सोडल्यानंतर ऑटोला सॅनिटाईज करीत असतो

लोकांच्या सोयीसाठी नंबर माझ्या ऑटोच्या मागे

दत्तात्रेय म्हणाले की, 'लोकांच्या सोयीसाठी मी माझा नंबर माझ्या ऑटोच्या मागील बाजूस लिहिला आहे. मी हे काम कोणत्याही लोभासाठी किंवा टाईमपाससाठी करत नाही नसून गरजू लोकांना 24 तास मदत मिळावी यासाठी करत आहे. त्यामुळे खरोखरच गरजू असेल त्यांनीच संपर्क करण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...