आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनादरम्यान पॉझिटिव्ह संकेत:महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात वार्षिक आधारावर जमा झाला 3 हजार 319 कोटी रुपये जास्त कर महसूल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात मे एकूण महिन्यात 29 हजार 887 कोटी कर महसूल जमा झाला.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कर महसूल प्रकरणात चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारने या दोन महिन्यात 10.47 टक्के महसूल कर जमा केला आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यात 5.72 टक्के कर महसूल जमा करण्यात आले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात 38 टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र सरकारच्या 2021-22 वर्षाच्या बजेटनुसार, राज्य सरकारला एका वर्षात 3 लाख 68 हजार 986 कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज आहे. यातील 2 लाख 85 हजार 533 कोटी रुपये कर स्वरुपात मिळेल. आतापर्यंत एप्रिल महिन्यात 17 हजार 851 कोटी रुपये तर मे महिन्यात 12 हजार 35 कोटी रुपये कर महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 6 हजार 898 कोटी रुपये तर मे महिन्यात 8 हजार 716 कोटी रुपये कर महसूल जमा करण्यात आला होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 38.09 टक्के म्हणजेच 3 हजार 319 रुपये कर महसूल अधिक जमा झाला आहे.

मे महिन्यात कोठून आला एवढा कर?
राज्यात मे एकूण महिन्यात 29 हजार 887 कोटी कर महसूल जमा झाला. यामध्ये जीएसटी कर 12,988 कोटी रुपये, स्टॅम्प किंवा रजिस्टर 1,968 कोटी रुपये, जमीन महसूल 224 कोटी रुपये, सेल्स टॅक्स 7,076 कोटी रुपये, स्टेट इक्साइज ड्यूटी 1,259 कोटी रुपये, केंद्रीय करातून राज्याला 4,949 कोटी रुपये आणि अन्य करातून 1,410 कोटी रुपये जमा करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...