आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Maharashtra Coronavirus Outbreak Latest News And Updates Corona COVID 19 Cases In Ahmadnagar Nagpur Aurangabad Latur Yavatmal Nashik Jalgaon Latest Today June 5 News

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील संक्रमितांचा आकडा 80 हजारांच्या पुढे, तर शुक्रवारी सर्वाधिक 139 रुग्णांचा मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाने भैमान घातले आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे सर्वाधिक 139 रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी गुरुवारी 123 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता राज्यातील एकूण मृतांचा आकडा 2,849 झाला आहे. राज्यात मागील 20 दिवसात 1,714 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वात चिंताजनक परिस्थिती मुंबईत आहे. येथे 24 तासात 93 रुग्णांचा बळी गेला आहे. मुंबईत आतापर्यंत 1,519 मृत्यू झाले आहेत. 

राज्यात शुक्रवारी 2,436 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यासोबतच राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 झाला आहे. यात 42,215 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. शुक्रवारी संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबईतील 93 आहेत. याशिवाय नाशिक  24, पुणे 16, रत्नागिरी 5 आणि औरंगाबादमधील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 75 पुरुष आणि 64 महिला आहेत.

गुरुवारी 123 जणांचा मृत्यू  झाला. यापूर्वी बुधवारी 122 रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच, मागील तीन दिवसात 984 रुग्णांचा बळी गेला आहे. गुरुवारी राज्यात 2,933 नवीन रुग्ण सापडले. देशातील 2 लाख 17 हजार 967 रुग्णांपैकी 35% रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत. गुरुवारी राज्यातील सर्वाज जास्त 68 मृत्यू एकट्या मुंबईत झाले. याशिवाय, नाशिकमध्ये 25, पुणे 16, औरंगाबाद 8, लातूर आणि अकोला 3-3 मृत्यू झाले. मृतांमध्ये 85 पुरुष आणि 38 महिला आहेत. यातील 71 रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, 44 रुग्णांचे वय 40 ते 60 दरम्यान आणि 8 रुग्णांचे वय 40 पेक्षा कमी आहे. राज्यात आतापर्यंत संक्रमणामुळे 2,710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये कोरोना चाचण्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. त्यांना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्रदेखील लिहीले आहे. फडणवीसांनी या पत्रात लिहीले की, मुंबईच्या विविध लॅबमध्ये 10 हजार सँपलची तपासणी करण्याची क्षमता आहे, पण दररोज 3500 ते 4000 चाचण्याच होत आहेत.

महाराष्ट्र कोरोना अपडेट्स 

 • महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 30 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 2,500 पेक्षा जास्त संक्रमित आहेत. 30 मृत पोलिसांपैकी 18 मुंबईचे होते. आता 1,510 पोलिसांना विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 • आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये मागील 24 तासात 23 नवीन रुग्ण सापडले. नवीन रुग्ण सापडल्यानंतर परिसरातील रुग्णसंख्या 872 झाली आहे. तसेच, आतापर्यंत धारावीमधल्या 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 • राज्यात बुधवारी 996 रुग्णांना घरी पाठवण्यात आले. राज्यातील आतापर्यंत 32 हजार 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील 82 लॅबमध्ये कोरोना चाचण्या होत आहेत. आतापर्यंत एकूण 4 लाख 97 हजार 276 लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत.
 • बॉम्बे हायकोर्टाने राज्यातील कनिष्ट न्यायालयांच्या कामकाजाबाबत नवीन गाईडलाइन्स जारी केल्या. यानुसार आता सोमवारपासून रेड झोनमध्ये येणाऱ्या भागातील कनिष्ट न्यायालयात फक्त 15% कर्मचारी आणि बिगर रेड झोन असलेल्या परिसरातील न्यायालयात 50% कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी असेल. न्यायालयांना या दरम्यान दोन शिफ्टमध्ये व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे सुनावनी करण्यास सांगितले आहे.
 • महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत महाराष्ट्रातून 11 लाख 86 हजार 212 प्रवासी मजुरांना त्यांच्या गृह राज्यात पाठवण्यात आले आहे. सर्वात जास्त मजूर उत्तर प्रदेशचे होते. या मजुरांना 822 श्रमिक विशेष रेल्वेमधून सोडण्यात आले.
Advertisement
0