आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:सलग दुसऱ्या दिवशी नवीन केसपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले, राज्याची केंद्राकडे 200 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील गोरेगावमध्ये लसीकरण केंद्राबाहेर झालेली गर्दी. - Divya Marathi
मुंबईतील गोरेगावमध्ये लसीकरण केंद्राबाहेर झालेली गर्दी.

कोरोनाने सर्वाधिक बाधित राज्य असलेल्या महाराष्ट्रातील परिस्थितीत आता सुधारणा दिसून येत आहे. राज्यात सलग दुसर्‍या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 65,934 लोक बरे झाले आणि 51,880 नवीन पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापूर्वी सोमवारी 59500 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि 48621 नवीन रूग्ण आढळून आले होते. सध्या राज्यात रिकव्हरी रेट 85.96% आहे. आतापर्यंत एकूण 48.22 लाख प्रकरणे आढळून आले आहेत. त्यापैकी .41.07 लाख रिकव्हर झाले आहेत. सध्या राज्यात 6.42 लाख सक्रिय रुग्ण आहेत.

केंद्राकडून ऑक्सिजन कोटा वाढवण्याची मागणी
ऑक्सिजनची वाढती गरज असल्याचे सांगून महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा (LMO) कोटा वाढवण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी 3 मे रोजी पत्र लिहून केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना ऑक्सिजनच्या कोट्यात 200 मेट्रिक टन वाढ करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने सांगितले की गुजरातमधील जामनगरहून 125 मेट्रिक टन आणि भिलाई येथून दररोज 130 मेट्रिक टन ऑक्सिजन येत आहे. हा ऑक्सिजन 225 आणि 230 मे.टनपर्यंत वाढवावा. कुंटे म्हणाले की, जामनगर आणि भिलाई हे महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहेत, म्हणून येथून येणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे. यामुळे दररोजच्या मागणीनुसार ऑक्सिजन मिळेल आणि त्याचे व्यवस्थापनही सुलभ होईल.

बातम्या आणखी आहेत...