आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग:45+ वयाच्या 12% लोकांना दिले लसीचे दोन डोस, मुंबईतील एकूण लोकसंख्येच्या केवळ 5.79% जणांचे लसीकरण झाले पूर्ण

मुंबई (विनोद यादव)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात मृत्यूदर कमी होऊन 1.76% झाला

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 45+ वयाच्या 39 लाख 02 हजार 233 लोकांमधून 12.42% लोकांना कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागानुसार 27 मेपर्यंत मुंबईमध्ये 45+ च्या 4 लाख 84 हजार 831 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. या व्यतिरिक्त 1 लाख 27 हजार 829 आरोग्य कर्मचारी आणि 1 लाख 40 हजार 505 फ्रंट लाइन वर्कर्सचेही दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

मुंबईची साधारण वार्षिक लोकसंख्या (2021) 1 कोटी 30 लाख 7 हजार 446 इतकी आहे. यापैकी आतापर्यंत केवळ 5.79% म्हणजेच 7 लाख 53 हजार 165 लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या डोससह, मुंबईत एकूण 31 लाख 55 हजार 320 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात 45+ वयाच्या 29 लाख 54 हजार 824 लोक म्हणजेच जवळपास 8% लोकांचे दोन्हीही लसीकरण झाले आहे. तर 45+ च्या 34.36% म्हणजेच 1 कोटी 32 लाख 76 हजार 978 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मृत्यूदर कमी होऊन 1.76% झाला
महाराष्ट्रात 1 मेपासून 26 मे दरम्यान दररोज जवळपास 40 हजार 210 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परंतु दिलासादायक बाब म्हणजेच राज्यात सरासरी मृत्यूदर कमी होऊन 1.76% झाला आहे. महाराष्ट्रात 31 जुलै 2020 ला कोरोना संक्रमित व्यक्तींचा मृत्यूदर 3.55% होता आणि यावर्षीच्या सुरुवातीच्या महिन्यात 31 जानेवारी 2021 ला 2.52% मृत्यूदर होता.

सरकारची चिंता संपली नाही
राज्यात कोरोना संक्रमित रुग्ण बरे होण्याचा दर 31 जुलै 2020 ला 58.77% असायचा. जो 26 मे 2021 ला वाढून 92.76% झाला आहे. तरीही महाराष्ट्र सरकारची चिंता संपलेली नाही. कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या 3 लाख 1 हजार 752 होती, पण 27 मे 2021 ला राज्यात गेल्या लाटेपेक्षा जवळपास 4.40% जास्त म्हणजेच 3 लाख 15 हजार 042 अॅक्टिव्ह कोव्हिड पेशेंट होते. मात्र 27 मे रोजी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन 3 लाख 01 हजार 041 झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...