आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 12,712 नवे रुग्ण, 13 हजारांवर बरे होऊन घरी, 344 बाधितांचा मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद 328, जालना 109, बीडमध्ये 90 नवे कोरोना रुग्ण

राज्यात बुधवारी १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ३४४ मृत्यूंची नोंद झाली. मात्र, नवीन रुग्णांच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आतापर्यंत कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ झाली असून सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ६६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

औरंगाबाद ३२८, जालना १०९, बीडमध्ये ९० नवे कोरोना रुग्ण

मराठवाड्यात कोरोनाचा कहर वाढला असून रुग्णसंख्येसह बळींच्या संख्येतही वाढ होत आहे. बुधवारी १२१५ नव्या रुग्णांची भर पडली आणि २९ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांमध्ये आैरंंगाबादेत ४, परभणी आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी ६, उस्मानाबाद ५, लातूर २, नांदेड ३ आणि जालना जिल्ह्यातील ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच बुधवारी रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र होते. औरंगाबाद जिल्ह्यात ३२८, लातूर ३२७, जालना १०९, नांदेड ९९, परभणी ५९, उस्मानाबाद १२४, बीड ९०, तर हिंगोलीत ७९ नवीन रुग्ण आढळले आहेत.

0