आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान भवन:अर्ज भरताच मुख्यमंत्री तडक बाहेर; राठोड यांना उशीर; काँग्रेस नेते अस्वस्थ, अशोक चव्हाण, थोरात ताटकळले 

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • यांनी भरले अर्ज, हे आहेत डमी उमेदवार

विधान भवनात दुपारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तडक निघून गेले, तर काँग्रेसचे उमेदवार मंठ्याचे राजेश राठोड हे उशिरा आले. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मात्र अस्वस्थ दिसत होते.

अधिकृत उमेदवाराचा अर्ज काही कारणास्तव रद्दबातल झाला तर पर्याय म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन डमी  उमेदवारी अर्ज तसेच एका अपक्षानेही उमेदवारी अर्ज सादर केल्याने ९ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व म्हणजे पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दुपारी बाराच्या दरम्यान विधान मंडळात येऊन भरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी, आमदार-मंत्री पुत्र आदित्य ठाकरे, तेजस यांच्यासह खासदार संजय राऊत, अनिल परब, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तडक निघून गेले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनीही याच वेळी अर्ज भरले. या वेळी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. 

अशोक चव्हाण, थोरात मात्र ताटकळले 

अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे विधान भवनातून तडक निघून गेले. तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी विधान भवनात दुपारीच उपस्थित झाले होते. मात्र काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश राठोड यांना उशीर होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. राठोड उशिरा आले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, काँग्रेसकडून दोन उमेदवार देण्यात आल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत हे असच सुरू राहिले तर आपण राजीनामा देऊ, असे सांगितले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने आपला एकच उामेदवार रिंगणात असल्याचे जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीमधील तणाव निवळला.

यांनी भरले अर्ज 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे (शिवसेना ), अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी ), राजेश राठोड (काँग्रेस), तर  भाजपतर्फे डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शनिवारीच उमेदवारी अर्ज भरले होते.

हे आहेत डमी उमेदवार 

सर्व पक्षांनी अधिकृत उमेदवार दिले असले तरी छाननीत एखाद्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर जागा हातची जाऊ नये म्हणून डमी उमेदवारही भाजप आणि राष्ट्रवादीने उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरण पावसकर, शिवाजीराव यशवंत गर्जे  यांनी तर भाजपकडून संदीप लेले आणि रमेश कराड यांनी डमी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्याशिवाय अपक्ष राठोड, शाहबाज अलाउद्दीन यांनीही अर्ज भरला आहे.

बातम्या आणखी आहेत...