आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज जप्त:नवी मुंबईत दीड किलो ड्रग्ज जप्त, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक, 1 कोटी 85 लाखांचा मुद्देमाल जप्त

नवी मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी मुंबईत आयपीएल सामने सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जवळपास दीड किलो ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत 1 कोटी 85 लाखांच्या जवळपास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उरण फाटा परिसरातील रेयान इंटरनॅशनल शाळेसमोर गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईत आयपीएल क्रिकेट सामने सुरु आहेत. यावेळी ड्रग्ज तस्कर सक्रिय झाले नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

1 कोटी 85 लाखांच्या ड्रग्जचा साठा पकडला​​​​​​​ या प्रकरणी गुन्हे शाखेने समसदिन शेख आणि राजेंद्र पवार या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 किलो 550 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 1 कोटी 85 लाख 27 हजारांच्यावर आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या आधी ही नवी मुंबईत अडीच कोटींचे ड्रग्जचा साठा पकडला गेला होता.

2022 मधील सर्वांत मोठी कारवाई
नवी मुंबईत आयपीएल क्रिकेट सामने सुरु आहेत. याच धर्तीवर मैदानाच्या बाहेर असे अंमली पदार्थ विक्रीला आणले तर नसावेत ना अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नवी मुंबईतील ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. याबाबत आणखी तपास गुन्हे शाखा करत आहे. नवी मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे

बातम्या आणखी आहेत...