आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर:कोरोना प्रतिबांधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 3 कोटी लस मात्रांचा टप्पा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व प्रकारच्या व्हेरिएंटवर प्रभावी आहे लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत 3 कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. आज सायंकाळी सातपर्यंत सुमारे 4 लाख 80 हजार नागरिकांना लस देण्यात आली. आज दुपारी दोनच्या सुमारास 3 कोटी डोसेसचा टप्पा ओलांडून महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहिले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रस्थानी आहे. आज झालेल्या लसीकरणामुळे सायंकाळी सात पर्यंत 3 कोटी 2 लाख 71 हजार 606 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. आज एकाच दिवसात 4 लाख 80 हजार 954 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

सर्व प्रकारच्या व्हेरिएंटवर प्रभावी आहे लस
देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. केंद्र सरकारने शुक्रवारी याची खातरजमा केली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) DG डॉ. बलराम भार्गव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की दुसरी लहर अद्याप संपलेली नाही, परंतु चांगली गोष्ट म्हणजे कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीन आतापर्यंतच्या सर्व प्रकारांविरूद्ध प्रभावी सिद्ध झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...