आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सरकारवर निशाणा:आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु, समन्वयाचा तसेच विश्वासाचा मोठा अभाव, फडणवीसांचे टीकास्त्र

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुरघोडीचा प्रकार वाटतोय, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिलेली दिसत नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या निमित्ताने सुरू असलेल्या चर्चावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली नाही. तसेच याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. 

याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांकडे आस्थापना मंडळ असते. ते मंडळ बदल्या ठरवीत असतात. मात्र महाविकास आघा़डी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव तर आहे. एवढेच नाही तर या सरकारमध्ये विश्वासाचा सुद्धा मोठा अभाव दिसतो आहे असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. तसेच  राज्य सरकारमध्ये एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे.  कुरघोडीचा प्रकार वाटतोय, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिलेली दिसत नाही त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्या असल्याचंही फडणवीस म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, माझा जो अनुभव आहे त्या प्रमाणे पोलीस आयुक्तांच्या समितीला अंतर्गत बदलीचे अधिकार देण्यात आलेले असतात. या बदल्यांची माहिती आयुक्त गृहमंत्र्यांना देतात. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतंत्र असताना गृहमंत्री या बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देत असतात. यानंतर या बदल्या होतात. मात्र, या प्रकरणात आयुक्तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिली नाही. नंतर हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं व त्यांनी या बदल्यांना स्थगिती दिली असेही ते म्हणाले. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser